बेस्ट मोबाईल अप्लिकेशन अवॉर्ड स्वीकारताना बँकेच अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी,मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के
बँको ब्लु रिबीन अवार्ड 2023 स्वीकारताना बँकेचे सचिव मा. श्री हरिषजी लाखाणी व संचालक श्री संजयजी कोटक
अकोला अर्बन बँकेला दोन मानाचे पुरस्कार प्राप्त, - बेस्ट मोबाईल अप्लिकेशन अवार्ड व बँक ब्ल्यु रिबीन अवॉर्ड 2023
विदर्भ आणि मध्यप्रदेशात कार्यरत असलेल्या दि अकोला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेला "बँकिंग फ्रंटीयर अवार्ड 2023" व “बँको” च्या वतीने बॅको ब्लु रिबीन उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. बँकिंग फ्रंटीयर च्या वतीने गोवा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात अकोला अर्बन बँकेच्या मोबाईल अॅप्लीकेशनला बँकिंग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा बँकिंग फ्रंटीयर अवार्ड 2023, बेस्ट मोबाईल अॅप्लीकेशन अवॉर्ड गोवा येथील एका कार्यक्रमात देण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के उपस्थित होते. तर बॅको ब्लू रिबन 2023 यांच्या वतीने दमण येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेचे माजी चिफ जनरल मॅनेजर पी. के. अरोरा यांच्या हस्ते अकोला अर्बन बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून Banco Blue Ribbon-2023 हा मानाचा पुरस्कार दमण येथे बँकेचे सचिव मा. श्री हरिषजी लाखाणी व संचालक श्री संजयजी कोटक यांनी स्वीकारला. या कार्यक्रमाला सात राज्यातून सहकारी बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेचे माजी चिफ जनरल मॅनेजर पी. के. अरोरा यानी अकोला अर्बन बँकेने केलेल्या प्रगतीबाबत गौरव उदगार काढले व शुभेच्छा दिल्या. बँकेला बेस्ट मोबाईल अप्लिकेशन अवार्ड व ब्लु रिबीन अवार्ड 2023 मिळाल्याबद्दल बँकेच्या संचालक मंडळाने सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी बँकेला प्राप्त झालेल्या दोन पुरस्काराबाबत सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत सर्वांचे कौतुक करीत कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने बँक उत्तरोत्तर प्रगती करत असल्याचे नमूद केले..
The payment to the claimant will be made by the branch where the account exist; after thorough checking of the records by the branch official. If the payment has already been made, the claim by the customer may be rejected.