News & Events Image News & Events Image

पूरग्रस्तांना दिलासा – अकोला अर्बन बँकेकडून ४.५१ लाखांचा मदतीचा हात

अकोला अर्बन बँकेकडून पूरग्रस्तांसाठी अर्थसहाय्य अकोला – राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या व्यापक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मा. मुख्यमंत्री निधी करिता अकोला मा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बँकेला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक योगदान देण्यात आले आहे. दि. अकोला अर्बन बँकेच्या वतीने एकूण ४,५१,०००/- (अक्षरी – चार लाख एक्कावन्न हजार रुपये फक्त) रक्कमेचा धनादेश अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. बँकेच्या ४६६ कर्मचाऱ्यांनी व संचालक मंडळाच्या सदस्यांनी आपले योगदान देत ही रक्कम उभारण्यात आली आहे. ही मदत बँकेचे अध्यक्ष शंतनु जोशी व मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांच्या हस्ते अकोला जिल्हाधिकारी मा. वर्षा मीना.यांना प्रदान करण्यात आली. दि अकोला अर्बन बँक ही केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून सामाजिक कार्यातही नेहमीच पुढाकार घेत असते, याचेच हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. बँकेच्या या सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी हे आर्थिक योगदान उपयुक्त ठरणार आहे. या प्रसंगी बँकेचे अधिकारी महेश जोशी व समीर थोडगे हे उपस्थित होते.

दि अकोला अर्बन बँकेच्या पुणे शाखेचे थाटात उद्घाटन

पुणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पुणे :– विदर्भातील ग्राहकांची विश्वासाहर्ता कमावलेली आणि ग्राहकसेवेसाठी नावाजलेली दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला हिची 36 वी शाखा पुणे शहरातील पिंपळे निलख येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात सुरू झाली. या भव्य उद्घाटन सोहळ्याला पुणेकर नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जामय वातावरण तयार झाले. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोदजी बन्सल (सीए) होते. प्रमुख अतिथी म्हणून अ. भा. बँकिंग प्रकोष्ट प्रमुख सहकार भारतीचे मा. अभयजी माटे (सीए) तसेच सहकार भारतीचे अ. भा. संघटन मंत्री मा. संजयजी पाचपोर यांनी उपस्थित राहून बँकेच्या कार्याचा गौरव केला. मंचावर बँकेचे अध्यक्ष शंतनू जोशी, उपाध्यक्ष राहुल राठी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष शंतनु जोशी यांनी करताना बँकेच्या वाटचालीचा आढावा सादर केला. त्यांनी बँकेने सहकार क्षेत्रात उभारलेले विश्वासाचे भक्कम अधिष्ठान आणि नव्या शाखेमुळे पुण्यातील ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधांचा उल्लेख केला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी बँकेच्या विविध कर्जाच्या योजना, आकर्षक ठेवी योजना, डिजिटल बँकिंग सुविधा आणि ग्राहकाभिमुख उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुणे शाखेच्या माध्यमातून बँकेच्या सेवांचा विस्तार पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणे होईल. पिंपळे निलख, पुणे शाखेचे शाखाधिकारी प्रवीण हातवळणे यांनी मंचावरील मान्यवरांचा परिचय करून दिला. तर आभारप्रदर्शन बँकेचे संचालक शार्दुल दिगंबर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूजा जलताडे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारीवृंदाने एकदिलाने मेहनत घेतली. सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे पुणे शाखेचा शुभारंभ हा केवळ उद्घाटन सोहळा न राहता ‘अकोला अर्बन बँकेच्या विश्वास आणि प्रगतीच्या प्रवासातील एक नवा पर्व’ ठरला. या प्रसंगी या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष राहुल राठी, तसेच संचालक अमरिकसिंग वासरीकर, प्रमोद शिंदे, मोहन अभ्यंकर, दिपक मायी, माधव बनकर, किरण खोत, कैलाश मशानकर, धनंजय पाटील, शार्दूल दिगंबर तसेच पिंपळे निलख परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, ग्राहक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शाखेमुळे पुण्यातील नागरिकांना पारदर्शक, आधुनिक आणि ग्राहककेंद्रीत बँकिंग सेवा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दि अकोला अर्बन बँकेला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार

अकोला : दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. बँकेला “युसीबींमधील सर्वोत्तम जोखीम व्यवस्थापन रूपांतरण” हा राष्ट्रीय स्तरावरील बँकिंग फ्रंटिअर पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. हा सन्मान गोवा येथे झालेल्या भव्य सोहळ्यात गोव्याचे माननीय सहकार मंत्री श्री. सुभाष शिरोडकर व नाफकबचे संचालक श्री. ज्योतिंद्रजी मेहता यांच्या हस्ते बँकेचे संचालक राहुल गोयनका, मोहन अभ्यंकर, अधिकारी योगेश निऱ्हाळे, प्रशांत अरबट यांना प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. बँकेच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, समर्पित कर्मचारीवृंद व कार्यक्षम व्यवस्थापन या त्रिसूत्रीमुळेच हा मानाचा सन्मान मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे. ग्राहकांचा विश्वास बँकेच्या सुरक्षा प्रणालीवर दृढ करण्याकरीता हा पुरस्कार एक पावती आहे. बँकेने आतापर्यंत सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत ग्राहकाभिमुख कार्यप्रणालीचा अवलंब केला असून, या पुरस्कारामुळे बँकेची प्रतिमा आणखी उजळली आहे. भविष्यात अशा अनेक यशशिखरे गाठावीत, अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध

दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध - अध्यक्षपदी शंतनु जोशी, उपाध्यक्षपदी राहुल राठी यांची एकमताने निवड अकोला : महाराष्ट्रातील अग्रगण्य, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,अकोलाच्या संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक अविरोध झाली. नवनिर्वाचित संचालकांमधून बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शंतनु शरदचंद्र जोशी तर उपाध्यक्षपदी राहुल चंद्रकांत राठी यांची संचालकांनी एकमताने निवड केली आहे. दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी कामकाज पहिले. संचालक मंडळाची निवडणूक अविरोध झाल्यानंतर नवनिर्वाचित संचालकांची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेत बुधवार, १८ डिसेंबर रोजी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये सभा संपन्न झाली. या सभेत नवनिर्वाचित संचालकांनी अध्यक्षपदी शंतनू जोशी तर उपाध्यक्ष म्हणून राहुल राठी यांची एकमताने निवड केली या सभेमध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व उपजिल्हाधिकारी विजय पाटील व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के उपस्थित होते. या सभेपूर्वी बँकेच्या संचालकपदासाठीच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात संचालक मंडळ अविरोध नवनिर्वाचित झाले. नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून शार्दुल दिगंबर, राहुल गोयनका, शंतनु जोशी, केदार खपली, अॅड. किरण खोत, संजय कोटक, कैलाशनाथ मशानकर, दिपक मायी, अॅड. धनंजय पाटील, राहुल राठी, शाखा प्रतींनिधी मतदार संघातून मोहन अभ्यंकर, माधव बनकर, अजय गांधी, अॅड. अमरीकसिंग वासरीकर, महिला प्रतींनिधी मतदार संघातून सीमा डिक्कर, संगीता गांधी तर अनुसूचीत जाती- जमाती मतदार संघातून प्रमोद शिंदे हे अविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी काम पहिले आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यामध्ये कार्यक्षेत्र असलेल्या 34 शाखांसह अविरत सेवा देणार्‍या बँकेची निवडणूक अविरोध पार पडल्यामुळे जन सामान्यांमधे बँकेची प्रतिमा अधिक भक्कम झाली आहे.

अकोला अर्बन बँकेला राष्ट्रीय स्तराचे तिन पुरस्कार प्राप्त

बँकिंग फ्रंटीयरच्या वतीने लखनऊ येथे संपन्न कार्यक्रमात विदर्भ आणि मध्यप्रदेशातील अग्रगण्य असलेल्या दि अकोला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेला "बँकिंग फ्रंटीयर अवार्ड तर्फे सन्मानित करण्यात आले. लखनऊ येथे दि. १९ ऑक्टोबर, २०२४ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात अकोला अर्बन बँकेला १) Best Co-operative Bank, २) Best KYC Initiative व ३) Best Reporting/MIS Initiative या तिनही कॅटेगरी मध्ये पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाला बँकेचे सचिव हरिष लाखाणी, संचालक संजय कोटक, राहुल राठी तसेच बँकेचे अधिकारी व CISO प्रशांत अरबट, चिफ मॅनेजर सुनील शेजोळे, मॅनेजर योगेश निर्‍हाळे उपस्थित होते. याशिवाय अभिमानाची बाब म्हणजे बँकेला नुकतेच Banking Operation, Core Banking System Application Support, Management & Maintenance संदर्भात I T Enabled Services (ITES) करिता ISO/IEC 27001:2022 प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. बँकेला तीन मानाचे पुरस्कार व ISO प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनु जोशी व संचालक मंडळाने सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी बँकेला प्राप्त झालेल्या तीन पुरस्काराबाबत सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत सर्वांचे कौतुक करून कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने तसेच मा. संचालक मंडळाचे मार्गदर्शनात बँक उत्तरोत्तर प्रगती करत असल्याचे नमूद केले.

दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला ने ISO 27001 प्रमाणपत्र प्राप्त केले

दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अकोला, आमच्या माहिती प्रणाली व्यवस्थापन पद्धतींमध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आमच्या मुख्य कार्यालयात (आयटी विभाग) 29 ऑगस्ट 2024 पासून लागू होणारे ISO/IEC 27001:2022 प्रमाणपत्र प्राप्त करण्यास आम्हाला अभिमान वाटतो. या प्रतिष्ठित मानकाचे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या भारतातील निवडक बँकांपैकी आम्ही एक आहोत.

ISO/IEC 27001:2022 हे एक माहिती सुरक्षा व्यवस्थापन मानक (Information Security Management Standard) आहे, जे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था (ISO) आणि आंतरराष्ट्रीय विद्युत तांत्रिक आयोग (IEC) द्वारे संयुक्तपणे प्रकाशित केले गेले आहे. हे माहिती सुरक्षा धोक्यांशी संबंधित जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी एक संरचित ढांचा प्रदान करते, ज्यामध्ये धोरणे, प्रक्रिया आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यांचा समावेश आहे.

ISO 27001 मानकात संस्थेच्या डेटाची मालमत्ता गमावणे किंवा अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि आवश्यकता समाविष्ट आहेत. तसेच, प्रमाणपत्राच्या माध्यमातून माहिती सुरक्षा व्यवस्थापनाप्रती वचनबद्धता दर्शविण्याचा एक मान्यताप्राप्त मार्ग प्रदान करते. या मानकात व्यापक जोखीम मूल्यांकन प्रक्रिया, संघटनात्मक रचना, माहिती वर्गीकरण, प्रवेश नियंत्रण यंत्रणा, भौतिक आणि तांत्रिक संरक्षक उपाय, माहिती सुरक्षा धोरणे, प्रक्रिया, निरीक्षण आणि अहवाल मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे.

ISO 27001:2022 एक महत्त्वपूर्ण यश का आहे? ISO 27001 प्रमाणपत्र हे ISO द्वारे प्रकाशित केलेले जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मानक आहे. हे मूलभूत सुरक्षा मानक प्रदान करते जे आमच्यासारख्या वित्तीय संस्थेसाठी अत्यावश्यक आहे, जी सार्वजनिक ठेवी स्वीकारते, कर्जे प्रदान करते आणि इतर वित्तीय सेवा पुरवते. ISO 27001 प्रमाणपत्र प्राप्त केल्याने आम्हाला आमच्या विशिष्ट गरजांसाठी सानुकूल आणि प्रभावी माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात मदत होते.

ISO 27001 प्रमाणपत्र प्राप्त केल्याने आमच्या बँकेच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंचे महत्त्व अधोरेखित होते:
जोखीम मूल्यांकन: आम्ही संभाव्य असुरक्षिततेचे काटेकोरपणे मूल्यांकन केले आहे आणि त्यांना प्रभावीपणे कमी करण्यासाठी धोरणे तयार केली आहेत.
डेटा गोपनीयता: तुमची गोपनीयता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. ISO 27001 आम्हाला कठोर डेटा संरक्षण नियमांचे पालन करण्यात मदत करते.
प्रतिक्रिया प्रणाली: सुरक्षा उल्लंघनाच्या अत्यंत दुर्मिळ घटनेत, आम्ही सज्ज आहोत आणि आमच्या प्रतिक्रिया प्रणाली स्पष्ट आहेत.

बँकांसाठी ISO प्रमाणपत्राचे फायदे ISO 27001-प्रमाणपत्रामुळे बँकांना अनेक फायदे मिळतात,
1. सायबर-हल्ल्यांपासून संरक्षण, जे बँकेची विश्वासार्हता हानी पोहोचवू शकतात आणि महत्त्वपूर्ण आर्थिक नुकसान करू शकतात. बँकिंग क्षेत्रात ISO प्रमाणपत्र लागू केल्याने असे हल्ले टाळण्यास मदत होते.

2. माहिती मालमत्तेसाठी जबाबदारी स्पष्टपणे ठरवणे, जे आमच्यासारख्या जलद वाढणाऱ्या संस्थांसाठी अत्यावश्यक आहे.
3. नवीन सुरक्षा पद्धतींविषयी जागरूकता वाढवणे.
4. जागतिक स्तरावर विश्वासार्ह प्रमाणपत्र जे पुरेसे सुरक्षिततेप्रती आमची वचनबद्धता दर्शवते, परिणामी ग्राहकांच्या वारंवार तपासणीची आवश्यकता कमी होते.
5. डेटा संरक्षण आवश्यकतांचे पालन करण्यात मदत होते.

अंतिम निष्कर्षात, दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. मध्ये सुरक्षा हा केवळ एक मैलाचा दगड नाही – ती आमच्या कामकाजाचा पाया आहे. हे प्रमाणपत्र माहिती सुरक्षा व्यवस्थापनाच्या उच्चतम मानकांचे पालन करण्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते. आम्ही आमच्या पद्धतींना सतत सुधारत राहू, जेणेकरून तुमचे आर्थिक व्यवहार सुरक्षित आणि सुरळीत राहतील. तुमच्या आर्थिक प्रवासासाठी आम्हाला निवडल्याबद्दल धन्यवाद!


सुरक्षित रहा, आत्मविश्वासाने राहा – दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला

अकोला अर्बन बँकेच्या ब्राह्मण सभा विस्तार कक्षाचे शाखेत रूपांतर ,ब्राह्मण सभा विस्तार कक्षाचे नव्या जागी स्थानांतरण अकोला

अकोला अर्बन बँकेच्या प्रगतीत दिवसेंदिवस वाढ होत असतांना, या बँकेच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवण्यात आलेला आहे. आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध असलेली बँक म्हणून नावाजलेली अकोला अर्बन बँक अधिक सेवा देता यावी या उद्देशाने भारतीय रिझर्व बँकेने अकोला अर्बन बँकेच्या ब्राह्मण सभा विस्तार कक्षाला शाखेचा परवाना दिल्यामुळे ब्राह्मण सभा विस्तार कक्षाचे शाखेत रूपांतर झाल्यामुळे स्थानांतरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्थानांतरण सोहळ्याला प्रमुख अतिथि अकोल्यातील प्रसिद्ध डॉ. सुशील फुंडकर यांच्या हस्ते नवीन शाखेचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर व संचालक मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुखेन शहा, विनोद अग्रवाल, नागोराव माहोरे यांच्या सह शाखेचे शाखाधिकारी किशोर फुलकर व कर्मचारी वृंद व ग्राहक भागधारक उपस्थित होते.

अथक परिश्रमाने बँक उच्च शिखरावर : प्रकाश पाठक, अकोला अर्बन बँकेच्या हीरक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

अकोला अर्बन बँकेने नुकतीच 60 वर्षे पूर्ण केली आहेत. या 60 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत बँकेने अनेक चढ-उतार पार केले. आजचा हिरक महोत्सव हे कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे, असे प्रतिपादन प्रकाश पाठक यांनी केले. ते अकोला अर्बन बँकेच्या हिरक महोत्सव उद्घाटन सोहळ्यात रविवार, 26 नोव्हेंबर रोजी बोलत होते. गोरक्षण मार्गावरील शुभमंगल फंक्शन सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे, बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी, सचिव हरीश लाखानी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांची उपस्थिती होती. समाजातील वंचित, उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकांसह महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बँकेने अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या. बँकेची मजबूत स्थिती प्रेरणादायी आहे. त्यासाठी बँकेच्या कर्मचार्‍यांनी विकासाचे स्वप्न बाळगून त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी भूतकाळात जे अविरत कष्ट केले आणि वर्तमानात जे कष्ट करीत आहेत ते अनेकांसाठी दिशादर्शक असल्याचे मत प्रमुख वक्ते प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपणा सर्वांचे आदर्श छत्रपती शिवराय आहेत. योगायोगाने शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे तर बँकेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. शिवरायांच्या जीवनातील त्याग, तपस्या या आदर्शांना स्मरूण बँकेला उच्च शिखरावर नेण्यासाठी प्रत्येकाने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सहकार भारतीने, सहकारी क्षेत्रातील बँकांच्या समस्या आरबीआयकडे पोहोचण्यासाठी जोरदार पाठपुरावा करून सर्व सहकारी बँकांच्या समस्या ऐकण्यासाठी एका नोडल अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. हे सहकार भारती मुळेच शक्य झाले, असे सांगत महाराष्ट्र प्रांताचे सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे यांनी बँकेला हिरक महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे संचालक मंडळ, महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील 34 शाखांचे शाखाधिकारी, कर्मचारी व अकोल्यातील शाखा निरीक्षक समितीचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमात २६/११च्या आतंकी हल्ल्यात वीरमरण आलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन पूजा परांजपे, अमोल तेलपांडे यांनी केले. आभार महेश जोशी यांनी मानले.

हिरक महोत्सव उद्घाटन समारंभात बोलताना प्रमुख वक्ते प्रकाश पाठक.

व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक जुगादे, बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनु जोशी, सचिव हरिष लाखाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के.

हिरक महोत्सव समारंभाला उपस्थित ईतर मान्यवर.

अकोला अर्बन बँकेला दोन मानाचे पुरस्कार प्राप्त, - बेस्ट मोबाईल अप्लिकेशन अवार्ड व बँको ब्लु रिबीन अवार्ड 2023

बेस्ट मोबाईल अप्लिकेशन अवॉर्ड स्वीकारताना बँकेच अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी,मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के

बँको ब्लु रिबीन अवार्ड 2023 स्वीकारताना बँकेचे सचिव मा. श्री हरिषजी लाखाणी व संचालक श्री संजयजी कोटक



विदर्भ आणि मध्यप्रदेशात कार्यरत असलेल्या दि अकोला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेला "बँकिंग फ्रंटीयर अवार्ड 2023" व “बँको” च्या वतीने बॅको ब्लु रिबीन उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. बँकिंग फ्रंटीयर च्या वतीने गोवा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात अकोला अर्बन बँकेच्या मोबाईल अ‍ॅप्लीकेशनला बँकिंग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा बँकिंग फ्रंटीयर अवार्ड 2023, बेस्ट मोबाईल अ‍ॅप्लीकेशन अवॉर्ड गोवा येथील एका कार्यक्रमात देण्यात आला आहे. या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के उपस्थित होते. तर बॅको ब्लू रिबन 2023 यांच्या वतीने दमण येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेचे माजी चिफ जनरल मॅनेजर पी. के. अरोरा यांच्या हस्ते अकोला अर्बन बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून Banco Blue Ribbon-2023 हा मानाचा पुरस्कार दमण येथे बँकेचे सचिव मा. श्री हरिषजी लाखाणी व संचालक श्री संजयजी कोटक यांनी स्वीकारला. या कार्यक्रमाला सात राज्यातून सहकारी बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते. रिझर्व्ह बँकेचे माजी चिफ जनरल मॅनेजर पी. के. अरोरा यानी अकोला अर्बन बँकेने केलेल्या प्रगतीबाबत गौरव उदगार काढले व शुभेच्छा दिल्या. बँकेला बेस्ट मोबाईल अप्लिकेशन अवार्ड व ब्लु रिबीन अवार्ड 2023 मिळाल्याबद्दल बँकेच्या संचालक मंडळाने सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी बँकेला प्राप्त झालेल्या दोन पुरस्काराबाबत सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत सर्वांचे कौतुक करीत कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने बँक उत्तरोत्तर प्रगती करत असल्याचे नमूद केले..

मोबाइल बँकिग सेवेचा शुभारंभ

अकोला अर्बन बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ अकोला. अधिकारा ऐवजी कर्तव्याच्या भावनेतून ज्या संस्था चालतात त्या प्रगती करतात. अकोला अर्बन बँकही त्याचेच उदाहरण आहे. सहकाराचे तत्व अंगिकारल्याने गेली 60 वर्ष ही संस्था प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन सहकार भारतीचे अ.भा. संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी केले. रविवारी सायंकाळी गोरक्षण मार्गावरील शुभमंगल फंक्शन सभागृहात अकोला अर्बन बँकेच्या मोबाईल अॅपचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी, सचिव हरीश लाखानी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के व्यासपीठावर होते. भारतमाता प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. रामेश्वर फुंडकर यांनी संजय पाचपोर यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. नवीन वर्षाच्या आरंभी मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून रामेश्वर फुंडकर म्हणाले, बँकेच्या प्रगतीत सामाजिक बांधिलकी हा महत्वाचा घटक राहिला आहे. भविष्यातील ग्राहकांचा विचार करून मोबाईल अॅप लाँच केले. तसेच बँकेची प्रगती पाहून रिझर्व बँकेने नवीन सुविधा देण्यास परवानगी दिली. बँकेची सन 2020-2021 सालचा डिव्हिडंट 4.50 टक्के दराने वितरित केला असून 2021-2022 या आर्थिक वर्षातील डिव्हिडंट 5.50 टक्के दराने देण्याचे घोषित केला आहे. तसेच मार्च 2022 अखेर ची आर्थिक स्थिती मजबूत व चांगली असून महाराष्ट्रा सोबतच संपूर्ण मध्यप्रदेशामध्ये शाखा विस्ताराची परवानगी मिळाली आहे. त्या सोबतच रिझर्व्ह बँकेने मोबाईल बँकिंग करिता चालू आर्थिक वर्षात मंजुरात देऊन आज इंग्रजी नववर्षाच्या सुरवातीला करण्यात येत आहे त्याचा ग्राहकांना लाभ होईल असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक, सीईओ राजन सोनटक्के यांनी केले. विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. योगेश निराळे यांनी मोबाईल अॅपविषयी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पूजा परांजपे यांनी तर आभार पंकज पाठक यांनी मानले. बँकेचे संचालक बाबासाहेब पाठक, दीपक मायी, संजय कोटक, केदार खपली, मंजुषा सोनटक्के यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

News & Events of Akola Urban Co-op. Bank Ltd. Akola

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांचे सहयोगाने आयोजित ग्राहक मेळावा व उद्योजकता कार्यशाळा चे उदघाटन सोहळ्यातील क्षणचित्रे. कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी भारत मातेचे पूजन व दिप प्रज्वलन करताना उद्घाटक मा. डॉ. श्री. रामदासजी आंबटकर, विधान परिषद सदस्य, मा. श्री. प्र. म. पार्लेवार संचालक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, बँकेचे अध्यक्ष मा. श्री. रामेश्वरजी फुंडकर, उपाध्यक्ष श्री. शंतनुजी जोशी, मु. का. अ. मा. श्री. राजनजी सोनटक्के व इतर मान्यवर.

सहकार क्षेत्रात छोट्या बँकांना सामावून घेण्याची ताकद - सतीश मराठे (संचालक,केंद्रीय बोर्ड , रिझर्व बँक ऑफ इंडिया)
नागरी बँकेच्या अनेक भागधारक,खातेधारक,ग्राहकांचे पैसे सुरक्षित

सहकार क्षेत्रात छोट्या बँकांना सामावून घेण्याची ताकद - सतीश मराठे (संचालक,केंद्रीय बोर्ड , रिझर्व बँक ऑफ इंडिया) 0 नागरी बँकेच्या अनेक भागधारक,खातेधारक,ग्राहकांचे पैसे सुरक्षित अकोला- इंदोर येथील सहकार क्षेत्रात नावाजलेली व 50 वर्ष जुनी नागरिक सहकारी बँक'दि अकोला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.अकोला" मध्ये विलीन झाली आहे. नागरिक सहकारी बँकेच्या सुभाष मार्ग, मल्हारगंज, संयोगीतागंज, एचआयजी कॉलनी या चार शाखा आहेत. दि.25.जुलै रोजी सुभाष मार्ग शाखेत श्री.गणेशाचे विधिवत पूजन करून अद्यावत नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ कार्यक्रमास मंचावर अध्यक्ष म्हणून सहकार क्षेत्रातील मान्यवर ज्योतींद्र मेहता अध्यक्ष, NAFCUB दिल्ली हे होते. तसेच प्रमुख अतिथि प्रकाश शास्त्री रा. स्व. संघाचे मालवा प्रांत संघचालक तसेच सतीश मराठे, संचालक रिझर्व बँक ऑफ इंडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांनी केले व बँकेच्या इंदोर वाटचाली बद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि सतीश मराठे यांनी विचार व्यक्त करताना मोठ्या सहकारी बँकांमध्ये छोट्या बँकांना सामावून घेण्याची ताकद आहे हे आजच्या विलीनीकरणा मुळे समाजात सिद्ध झाले आहे. नागरिक सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत हा विश्वास बँकेच्या ग्राहंकांमध्ये अकोला अर्बन बँके मुळे वृद्धिंगत झाला आहे त्यामुळे आम्हाला खाजगी बँका कडे जाण्याची गरज नाही ही आजची मोठी उपलब्धी आहे असे गौरवोदगार मराठे यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि प्रकाश शास्त्री यांनी आपल्या भाषणात अनेक सहकारी बँकांना शासनाची मदत मिळत असते,पण अकोला अर्बन बँक शासनाच्या मदतीशिवाय उत्तम कार्य करते आहे हे अभिनंदनास्पद आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता यांनी आपल्या भाषणात अकोला अर्बन बँकेने नागरिक सहकारी बंकेला आपल्या बँकेत विलीन करून घेतल्यामुळे अनेक परिवार सुरक्षित झाल्यामुळे समाधान व्यक्त केले. मध्य प्रदेशातील मुख्य बाजारपेठ असलेल्या इंदोर येथे ही बँक आता दि अकोला अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि. (मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक) या नावाने ओळखली जाईल. शहरातील प्रतिष्ठित नागरिक या बँकेचे ग्राहक व भागधारक आहेत. या कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी व सचिव हरिषभाई लाखानी तसेच बँकेचे संपुर्ण संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के याच्या समवेत बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रतिभा जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजन सोनटक्के यांनी केले. याप्रसंगी बँकेचे सन्माननीय ग्राहक तथा भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banking Facility