News & Events
मोबाइल बँकिग सेवेचा शुभारंभ
July 18, 2026
अकोला अर्बन बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ
अकोला. अधिकारा ऐवजी कर्तव्याच्या भावनेतून ज्या संस्था चालतात त्या प्रगती करतात. अकोला अर्बन बँकही त्याचेच उदाहरण आहे. सहकाराचे तत्व अंगिकारल्याने गेली 60 वर्ष ही संस्था प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन सहकार भारतीचे अ.भा. संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी केले. रविवारी सायंकाळी गोरक्षण मार्गावरील शुभमंगल फंक्शन सभागृहात अकोला अर्बन बँकेच्या मोबाईल अॅपचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, उपाध्यक्ष शंतनू जोशी, सचिव हरीश लाखानी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के व्यासपीठावर होते. भारतमाता प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. रामेश्वर फुंडकर यांनी संजय पाचपोर यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. नवीन वर्षाच्या आरंभी मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून रामेश्वर फुंडकर म्हणाले, बँकेच्या प्रगतीत सामाजिक बांधिलकी हा महत्वाचा घटक राहिला आहे. भविष्यातील ग्राहकांचा विचार करून मोबाईल अॅप लाँच केले. तसेच बँकेची प्रगती पाहून रिझर्व बँकेने नवीन सुविधा देण्यास परवानगी दिली.
बँकेची सन 2020-2021 सालचा डिव्हिडंट 4.50 टक्के दराने वितरित केला असून 2021-2022 या आर्थिक वर्षातील डिव्हिडंट 5.50 टक्के दराने देण्याचे घोषित केला आहे. तसेच मार्च 2022 अखेर ची आर्थिक स्थिती मजबूत व चांगली असून महाराष्ट्रा सोबतच संपूर्ण मध्यप्रदेशामध्ये शाखा विस्ताराची परवानगी मिळाली आहे. त्या सोबतच रिझर्व्ह बँकेने मोबाईल बँकिंग करिता चालू आर्थिक वर्षात मंजुरात देऊन आज इंग्रजी नववर्षाच्या सुरवातीला करण्यात येत आहे
त्याचा ग्राहकांना लाभ होईल असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक, सीईओ राजन सोनटक्के यांनी केले. विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. योगेश निराळे यांनी मोबाईल अॅपविषयी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन पूजा परांजपे यांनी तर आभार पंकज पाठक यांनी मानले. बँकेचे संचालक बाबासाहेब पाठक, दीपक मायी, संजय कोटक, केदार खपली, मंजुषा सोनटक्के यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.