News & Events Image News & Events Image

दि अकोला अर्बन बँकेला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार

July 25, 2026

दि अकोला अर्बन बँकेला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार
अकोला : दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. बँकेला “युसीबींमधील सर्वोत्तम जोखीम व्यवस्थापन रूपांतरण” हा राष्ट्रीय स्तरावरील बँकिंग फ्रंटिअर पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. हा सन्मान गोवा येथे झालेल्या भव्य सोहळ्यात गोव्याचे माननीय सहकार मंत्री श्री. सुभाष शिरोडकर व नाफकबचे संचालक श्री. ज्योतिंद्रजी मेहता यांच्या हस्ते बँकेचे संचालक राहुल गोयनका, मोहन अभ्यंकर, अधिकारी योगेश निऱ्हाळे, प्रशांत अरबट यांना प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. बँकेच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, समर्पित कर्मचारीवृंद व कार्यक्षम व्यवस्थापन या त्रिसूत्रीमुळेच हा मानाचा सन्मान मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे. ग्राहकांचा विश्वास बँकेच्या सुरक्षा प्रणालीवर दृढ करण्याकरीता हा पुरस्कार एक पावती आहे. बँकेने आतापर्यंत सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत ग्राहकाभिमुख कार्यप्रणालीचा अवलंब केला असून, या पुरस्कारामुळे बँकेची प्रतिमा आणखी उजळली आहे. भविष्यात अशा अनेक यशशिखरे गाठावीत, अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Banking Facility